औरंगाबाद: रेल्वेस्थानक परिसरात चोरांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. रेल्वेने प्रतिदिन हजारो प्रवासी ये-जा करीत असतात. त्यातच रेल्वेची वेळ लक्षात घेऊन चोर रेल्वेस्थानक परिसरात तळ ठोकून बसत आहे. रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशी रात्रीच्या वेळेस अंधारात एकांतात लघुशंकेसाठी जातात. याचाच फायदा चोर घेत असून, प्रवाशांची लूट करत आहेत. रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात कुठेही लघुशंकेसाठी जाऊ नये, असे वारंवार आवाहन केले आहे. मात्र प्रवासी याकडे पाठ फिरवित आहेत. त्याचाच फायदा चोर घेत असून, प्रवाशांची एकांतात अडवणूक करून लूट करत आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार चोरट्याने प्रवाशाला अडविले.
सोमवारी (दि.3) रात्री 9.30 पार्किंग जवळील अंधारात लघुशंका करण्यासाठी गेलेल्या एका प्रवाशाचा पाठलाग करीत चार चोरट्याने प्रवाशाला अडविले. ‘पैसे काढ’ म्हणत दमदाटी करीत लुटण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले होते. मात्र चोरट्यांना प्रवाशांच्या पत्नीने पाहिलेले असल्याने पत्नीने पोलिस असल्याचे चोरांच्या लक्षात येताच चोरांनी पळ काढला.
दरम्यान, प्रवाशाची पत्नी पोलिस असल्याने चोरांनी प्रवाशांना लुटले नाही. परंतु सर्वसामान्य प्रवाशांचे काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रवाशांनी अंधारात कुठेही लघूशंका करण्यासाठी जाऊ नये. रेल्वेस्थानक परिसरात सुरक्षा वाढविण्यात येईल. असे रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक अरविंद शर्मा यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना स्पष्ट केले.